पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:47 AM2018-12-18T01:47:24+5:302018-12-18T01:48:03+5:30

नाशिक येथून भाडोत्री कार घेऊन शनि शिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या त्रिकुटाने सोमवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून देत कार लांबवल्याची घटना तालुक्यातील पाथरे शिवारात सायाळे रस्त्यावर घडली.

 Car stopped showing pistols | पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली

पिस्तुलाचा धाक दाखवत कार लांबवली

Next

सिन्नर : नाशिक येथून भाडोत्री कार घेऊन शनि शिंगणापूरला दर्शनासाठी निघालेल्या त्रिकुटाने सोमवारी (दि. १७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून देत कार लांबवल्याची घटना तालुक्यातील पाथरे शिवारात सायाळे रस्त्यावर घडली.  सोमवारी (दि. १७) रात्री २ वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील तिघांनी द्वारका (नाशिक) येथून शनिशिंगणापूरला जाण्यासाठी एका खासगी कंपनीकडून आॅनलाईन कार बुक केली होती. कंपनीकडे द्वारका परिसरातून तात्काळ नोंदणीकृत कार देणे शक्य नसल्याने तातडीची सेवा म्हणून खाजगी कार सर्व्हिसेसमार्फत (एमएच १५ ईई ०९०२) स्विफ्ट डिझायर कार सदर प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पाठवण्यात आली होती. एजाज अफजल पटेल (२८) रा. कॅनॉल रोड, जेलरोड (नाशिकरोड) हा कारमध्ये तिघा प्रवाशांना घेऊन शनिशिंगणापूरकडे निघाला.
सिन्नरजवळ आल्यावर शिर्डीमार्गे कार नेण्याची सूचना या प्रवाशांनी केल्यावर चालकाने शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण केले. वावी गाव सोडल्यानंतर पाथरे गावाजवळ चालकाच्या डोक्याला पिस्तूलसदृश्य हत्यार लावत या प्रवाशांनी त्याला आम्ही सांगू तिथे कार थांबव, असे धमकावले. मात्र वाहनांची वर्दळ असल्याने पाथरे गावालगत असलेल्या सायळे रस्त्याकडे कार न्यायला चालकाला भाग पाडण्यात आले.  महामार्गापासून अर्धा किलोमीटर आत असणाऱ्या सनमुन हॉटेलजवळ चालक एजाज याला खाली उतरवत त्याचा मोबाइल फोन, खिशातील कागदपत्रे व १७०० रु पये रक्कम काढून घेत त्याला तेथे सोडून पुन्हा शिर्डी महामार्गाने या त्रिकुटाने कार पळवली. दरम्यान, कंपनीकडे यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
टोल नाक्यावर सजग राहण्याच्या सूचना
च्चालकाने हॉटेलमधील सेवकांना घडल्या प्रकारची माहिती देत तेथूनच वावी पोलीस ठाण्यात संपर्कसाधला. सहायक निरीक्षक संदीप बोरसे यांनी सहकाºयांसह धाव घेत एजाजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कारचे व तिघा संशयितांचे वर्णन घेऊन नाशिक व नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सूचित करत नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले. लगतच्या टोल नाक्यावरही सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र कुठेही कार आढळून आली नाही.

Web Title:  Car stopped showing pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.