नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे कार पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:42 IST2018-11-16T17:42:16+5:302018-11-16T17:42:29+5:30

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशींगोटे येथील मानोरी चौफुली जवळ बायपासवर मारुती सियाय कार पेटल्याची घटना घडली.

A car rammed into the Nandurshingote on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे कार पेटली

नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे कार पेटली

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशींगोटे येथील मानोरी चौफुली जवळ बायपासवर मारुती सियाय कार पेटल्याची घटना घडली.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कार मालक अविनाश रावसाहेब बेंद्रे (24) हे रियाज कार (एम एच १४ ईव्ही ६३००) नाशिक कडून बाभाळेश्वर येथे जात होते. लघु शंकेसाठी वावी चौफुलीवर थांबले असता कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच सिन्नर पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. काही वेळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. शार्टसर्किटमुळे कार पेटली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात याबाबत नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रकाश गवळी व सुधाकर चव्हाणके अधिक तपास करीत आहे. कार जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

 

Web Title: A car rammed into the Nandurshingote on Nashik-Pune highway

टॅग्स :fireआग