कारची काच फोडून दागिने, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:24 IST2019-12-22T23:21:50+5:302019-12-23T00:24:46+5:30
पर्यटन आणि देवदर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांच्या इर्टिगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७१ हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना भावली धरण परिसरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता घडली. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारची काच फोडून दागिने, रोकड लंपास
घोटी : तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांच्या इर्टिगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ७१ हजारांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून नेल्याची घटना भावली धरण परिसरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता घडली. इगतपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदिवली कल्याण येथील अलोक अशोक बगाडे हे पत्नी सुनीता, मुलगी सुप्रिया, सासू तानूबाई केंग, लीलाबाई किर्वे, गोकुळ रंधवे, सुप्रिया गोकुळ यांच्यासह इर्टिगा कारने (क्र. एमएच ०५ सीएम ०६६७) इगतपुरी तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शनासाठी आले होते.
परत आल्यानंतर गाडीची काच फुटलेली दिसली. चोरट्यांनी यात सोने, चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत अलोक बगाडे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे विनोद गोसावी आणि सहकारी तपास करीत आहेत.