शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

.....पुन्हा एक बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:01 IST

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता आनंदा मधे (६) बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या घटने ...

ठळक मुद्देघोटी : स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता आनंदा मधे (६) बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या घटने नंतर वनविभागातर्फे लावण्यात आलेला पिंजऱ्यात चार दिवसापूर्वी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. दरम्यान चारच दिवसात आज पहाटेही पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.या जंगल व परिसरात ४ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावले होते. गेल्या आठवड्यात ( दि. २४नोव्हेंबर ) रोजी पहाटेच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. मंगळवारी (दि.१) पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. आज पकडण्यात आलेला बिबट्या हा ज्या ठिकाणी चिमुरडीवर हल्ला केला होता, त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे.गेल्या आठवड्यात जेरबंद झालेल्या बिबट्यापेक्षा हा बट्या त्याच वयाचा साधारण चार ते साडे चार वर्षांचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागातर्फे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी ई. टी. भले, वनरक्षक एस. के. बोडके, एफ. जे. सय्यद, आर. टी. पाठक, एम. जे. पाडवी, बी. एस. खाडे आदी उपस्थित होते.तालुक्यातील बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून पूर्व भागात नागरिकांवर बिबट्याचे हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पिंपळगाव मोर व परिसरातील भागात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या चर्चा गावातून होतचं आहेत. दोन दिवसांपूर्वी धामणी व अडसरे परिसरात देखील सायंकाळच्या वेळेस बिबट्या दिसला होता. परिसरात अजूनही चार ते पाच बिबटे असल्याच्या छुप्या चर्चाही होत आहेत. अजून काही दिवस पिंजरे ठेवावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने दहशत निर्माण झालेली आहेच. शिवाय गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी शेतीकडे जावे लागते. त्यामुळे गावकाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.घटनास्थळी बघ्यांची गर्दीबिबट्या जेरबंद झाल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली व फोटोसेशनही जोरात झाले. फोटो काढणारांच्या गोंधळामुळे बिबट्या मध्येच डरकाळी फोडून पिंजऱ्याला धडक देत होता. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRural Developmentग्रामीण विकास