शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

By admin | Updated: November 12, 2016 22:11 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेकडे उमेदवारांची चणचण

 इंदिरानगर : महापालिका निवडणुकीसाठी झालेली नवीन प्रभागरचना आणि आरक्षण रचनेमुळे पक्षाकडून तिकीट कसे मिळेल, यासाठी इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. नवीन प्रभाग २३ आणि ३0 मध्ये भाजप व शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीची शक्यता टाळता येत नाही तर मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे.प्रभाग ३८ चे विद्यमान नगरसेवक सतीश कुलकर्णी, नीलिमा आमले व प्रभाग ४0 चे विद्यमान नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे यांचे दोन प्रभाग मिळून नवीन प्रभाग २३ झाला आहे. प्रभाग ४0 मधील कमोदनगर, भारतनगर, शिवाजीवाडी, श्रीरामनगर, विनयनगर, इंदिरानगरचा काही भाग आला आहे. तसेच प्रभाग ३८ मधील डीजीपीनगर, गणेशबाबानगर, सावता माळी रस्ता आदि भाग आला आहे. नवीन प्रभाग २३ ला आरक्षणाने अ विभाग हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच ब विभाग हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी असल्याने कोण बंडखोरी करून पक्ष बदलतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.प्रभाग ५३ चे विद्यमान नगरसेवक सतीश सोनवणे, अर्चना जाधव तर प्रभाग ५४ चे नगरसेवक संजय चव्हाण, रशिदा शेख व प्रभाग ३८ चा वडाळागाव असे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभाग ३0 झाला आहे. प्रभाग ३८ मधील वडाळागाव आले आहे. नवीन प्रभाग ३0 चे आरक्षण अ अनुसूचित जातीसाठी असल्याने सर्वच पक्षांना उमेदवाराचा शोध घ्याला लागणार आहे. तर ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर क भाग सर्वसाधारण महिला व ड हा सर्वसाधारण अशी विभागणी झाल्याने अनेक विद्यमान नगरसेवक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)