शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-गोपालवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:53 IST

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या भागात गटारीचे काम करण्यात आले. त्यानंतर थातुरमातुर पध्दतीने मुरूम टाकण्यात येऊन रस्ता दुरुस्ती के ली गेली, मात्र पावसाळ्यात खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.भूमिगत गटारीच्या कामासाठी हा रस्ता तीन महिन्यांपूर्वी मनपाच्या भुयारी गटार विभागाकडून खोदला गेला. त्यानंतर गटारीचे काम आटोपल्यानंतर उखडलेल्या रस्त्याचे खडीकरण कसे तरी संबंधित विभागाकडून केले गेले, मात्र मागील पंधरवड्यापूर्वी झालेल्या जोरदार संततधारेत खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे रस्त्यावरून पायी जाणेदेखील शक्य होत नसल्याने या भागातील नागरिकांना रस्ता बदलावा लागत आहे. वाहने येथून मार्गस्थ होताच नादुरुस्त होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. पावसाने उघडीप देऊनदेखील अद्याप वडाळागावातील रस्त्यांची दुरुस्तीकडे लक्ष पुरविले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.वडाळागावात पावसाळापूर्व भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता एका बाजूने पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे त्याचा वापर नागरिकांना करता येणे अशक्य होत आहे. वडाळा चौफुलीपासून थेट पांढरी आई देवी मंदिरापर्यंत वडाळागावाच्या मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचीही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे मनपा प्रशासनाने माती-मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापेक्षा थेट डांबरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. कारण श्रावणसरींचा वर्षाव अद्यापही सुरू असून पावसाने माती, मुरूम वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरण्यास मदत होईल, असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका