वैतरणा धरणातील कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:54 IST2021-02-26T23:17:13+5:302021-02-27T00:54:35+5:30
मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.

वैतरणा धरणातील कालवा फुटला
वैतरणानगर : मुंंबई महानगला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या वैतारणा धरणाच्या दोन कालव्यांपैकी एका कालव्याला भगदाड पडले आहे. यामुळे मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यावर व वीजनिर्मीती वर परीणाम होण्याची शक्यता आहे.
वैतरणा धरणातून पाणी बाहेर पडणाऱ्या दाबातुन वीजनिर्मीती केली जाते. नंतर दोन कालव्याद्वारे ६०० क्यूसेस पाणी बी फोर डॅममध्ये सोडले जाते. तेथे पाणी साठवून त्यापाण्याच्या दाबावर बी पाँईटच्या केंद्रातून वीजनिर्मीती करून पाणी मुंबई महानगरला पुरवले जाते. शुक्रवारी (दि.२६) दुपारी २ वाजता या दोन कालव्यापैकी एका कालव्याच्या सिमेंट काँक्रीटला तडा जाऊन कालवा फुटल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुपारी ४ वाजता कालव्याला पाणी सोडणारे गेट बंद करण्यात आले.
वैतारणा धरणाचे हे दोन्ही कलवे ४८ वर्षाचे जीर्ण झाले आहेत. त्याची वेळेवर देखभाल होत नाही. त्यावर झाडे झुडपे होतात त्यांच्या मुळानी कालव्याच्या भरावाला तडे जाऊन त्यातून पाणी पाझरून कालवा फुटतो.