नाशिक : अगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या दोषविरहित आणि शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून शनिवार (दि.२०) पासून जिल्ह्यात मतदार याद्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर गेल्या महिनाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ४० हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे २८ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आल्यामुळे मतदार यादीतील १२ हजार नावांची घट झालेली आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे मतदार याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात आले असले तरी याद्यांच्या शुद्धीकरणासाठी पुन्हा एकदा अशाप्रकारची मोहीम पुन्हा राबविली जाणार आहे. यासाठीचे नियोजन जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी दि. २०, २१ आणि २७ व २८ रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. या मोहिमेत मतदार नोंदणी, नावे वगळणे, दुरुस्ती करणे यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियंत्रणासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुका पातळीवरील विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपअभियंता, सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
आजपासून मतदार याद्यांसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:04 IST
अगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या दोषविरहित आणि शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून शनिवार (दि.२०) पासून जिल्ह्यात मतदार याद्यांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
आजपासून मतदार याद्यांसाठी मोहीम
ठळक मुद्देजिल्हात नियोजन : प्रमुख अधिकाऱ्यांकडे जबाबदारी