लस उपलब्ध न झाल्याने मोहीम बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:17 IST2021-05-04T00:16:55+5:302021-05-04T00:17:29+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

The campaign stalled due to non-availability of vaccines | लस उपलब्ध न झाल्याने मोहीम बारगळली

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लसीकरण केंद्र.

ठळक मुद्दे डोंगरगाव ग्रामस्थांचा झाला मोठा हिरमोड

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित मागणी लसीकरणाची तालुका प्रशासनाकडे केली होती, परंतु सर्व जिल्हाभर लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकारणाने सोमवारची नियोजित लसीकरण मोहिम राबविता आली नाही. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने केंद्रातील तयारी पूर्ण केली आहे. सर्व खोल्या स्वच्छ करून सॅनिटायझर फवारणीद्वारे निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. लसी लवकर उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी सरपंच दयाराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची तयारी पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी पोलीस पाटील प्रल्हाद केदारे, ग्रामसेवक सतीश मोरे, मुख्याध्यापक समाधान सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सावंत, खंडू सावंत आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: The campaign stalled due to non-availability of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.