मतदान यंत्रांच्या प्रसारासाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 13:00 IST2018-12-15T13:00:46+5:302018-12-15T13:00:56+5:30
सटाणा:भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वित्रक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आली असल्याची माहिती बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

मतदान यंत्रांच्या प्रसारासाठी मोहीम
सटाणा:भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार धुळे लोकसभा सार्वित्रक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्याची मोहीम बागलाण विधानसभा मतदारसंघात हाती घेण्यात आली असल्याची माहिती बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. मतदार जनजागृतीच्या या कार्यक्र माचा प्रचार प्रसार माध्यमांनी करावा या मुख्य उद्देशाने येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार प्रमोद हिले,नायब तहसीलदार दीपक धिवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हन घेवून या मशीन्सची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी व मतदाराकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान करून घेवून मतदानाच्या शेवटी सर्वांसमोर मशीनमधील मतदानाची मोजणी करून दाखविण्यासाठी कार्यक्र म तयार करण्यात आला असून १५ जानेवारी २०१९ पर्यंत ही मोहीम संपूर्ण बागलाण तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.या जनजागृती
कार्यक्र माअंतर्गत बागलाण विधानसभा मतदार संघात जनजागृतीच्या दोन पथकांची निर्मिती करण्यात आली असून ज्या त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी या पथकाचे प्रमुख राहणार आहेत.यावेळी उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील या मशीन्सची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली.