शहरात बेवारस वाहने उचलण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:25 IST2018-12-05T23:24:39+5:302018-12-05T23:25:04+5:30
नाशिक : शहर वाहतूक शाखा व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यांवर वापराविना पडून असलेली बेवारस वाहने उचलून नेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे़ मात्र, या कारवाईसाठी नागरिकांची तक्रार असणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़

शहरात बेवारस वाहने उचलण्याची मोहीम
नाशिक : शहर वाहतूक शाखा व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यांवर वापराविना पडून असलेली बेवारस वाहने उचलून नेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे़ मात्र, या कारवाईसाठी नागरिकांची तक्रार असणे गरजेचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़
शहरात अनेक ठिकाणची मैदाने, सोसायटीच्या पार्किंगजवळ तसेच रस्त्यावरही अनेक ठिकाणी वाहने उभी असल्याचे दिसून येते़ यापैकी काही वाहने अनेक वर्षांपासून एकाच जागेवर उभी आहेत. अशी वाहने आता टोर्इंग करून उचलून नेली जाणार आहेत. या वाहनांची संबंधित वाहनमालकांनी विल्हेवाट न लावल्यास त्यांचा लिलाव केला जाणार आहे़ तसेच या मालकांना त्यांची वाहने परत हवी असल्यास दंड आकारणी तसेच पुन्हा रस्त्यावर बेवारस लावली जाणार नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे़
शहरातील या बेवारस वाहने हटाव मोहिमेमुळे रस्त्यातील अडथळा तसेच स्वच्छतेस मदत मिळणार आहे़ याबाबतची बैठक बुधवारी महापालिकेत झाली असून, कारवाईसाठी आवश्यक शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबतही चर्चा करण्यात आली़ दरम्यान, टोर्इंग केलेल्या वाहनांसाठी महापालिका मोकळी जागाही उपलब्ध करून देणार आहे़