बिबट्याच्या हल्यात वासरु गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:04 IST2021-02-03T21:13:27+5:302021-02-04T00:04:58+5:30

देशमाने : देशमाने (बु) शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. बुधवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास मुखेड फाट्यालगत रमेश गावडे यांच्या शेतवस्तीत घराबाहेर बांधलेल्या जरसी वासरावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.

The calf was seriously injured in the leopard attack | बिबट्याच्या हल्यात वासरु गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्यात वासरु गंभीर जखमी

ठळक मुद्देदेशमाने बु. शिवारात वावर : नागरिकांत घबराट

देशमाने : देशमाने (बु) शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. बुधवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास मुखेड फाट्यालगत रमेश गावडे यांच्या शेतवस्तीत घराबाहेर बांधलेल्या जरसी वासरावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.                                वनविभागाच्यावतीने वनपाल प्रसाद पाटील यांनी पंचनामा केला असून पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे. गत महिन्यात बिबट्याने अनेक कुत्री फस्त केली. मात्र अन्य वन्य प्राण्यांनी कुत्री खाल्ली असावी, असा समज असल्याने खात्री पटत नव्हती. मात्र नंतर वन विभागाच्यावतीने पिंजरा देखील लावण्यात आला आहे.
             दरम्यान बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Web Title: The calf was seriously injured in the leopard attack