दातली येथे वीज कोसळून वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:52 IST2021-05-30T22:08:09+5:302021-05-31T00:52:29+5:30

सिन्नर: मान्सूनपूर्व आलेल्या वादळी पावसामुळे दातली येथील एका घराचे पत्र्याचे छत उडाले, तर दुसऱ्या घटनेत वीज पडून वासरू ठार झाल्याची घटना घडली.

A calf was killed in a lightning strike at Datli | दातली येथे वीज कोसळून वासरू ठार

दातली येथे वीज कोसळून वासरू ठार

ठळक मुद्देधान्य भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान

सिन्नर: मान्सूनपूर्व आलेल्या वादळी पावसामुळे दातली येथील एका घराचे पत्र्याचे छत उडाले, तर दुसऱ्या घटनेत वीज पडून वासरू ठार झाल्याची घटना घडली.

अचानक आलेल्या या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला जनावरांचा चारा उडून गेला. या वादळी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांना शेतातून काढलेला उन्हाळी कांदा, गुरांचा चारा झाकण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. दातली येथील शेतकरी कारभारी रंगनाथ शेळके यांच्या घराचे पत्र्याचे छत उडाल्याने शेळके यांच्या घरातील सर्व संसार उघड्यावर पडला. त्यांच्या घरात साठवून ठेवलेले धान्य भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: A calf was killed in a lightning strike at Datli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.