शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पिंपरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:29 PM

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात आहेर वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच महिन्याचे वासरू ठार झाले.

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात आहेर वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच महिन्याचे वासरू ठार झाले. पिंपरी शिवारात मध्यरेल्वे च्या गेट न . ९८ जवळ विजय गंगाधर अहेर यांच्या वस्तीवर बिबट्याने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाच महिन्याचे वासरू फस्त केले. अहेर यांच्या वस्तीजवळील विलास निखाडे यांच्या द्राक्ष बागेजवळ वासरू मृतावस्थेत आढळून आले. परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचे पंजे आढळले असून या भागात बिबट्याचा संचार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्यात घबराट निर्माण झाली आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा , या परिसरात बिबट्याचा माग घेऊन पिंजरा लावण्यात यावा , अशी मागणी अमोल मोतीराम अहेर , सचिन बाजीराव अहेर, विलास काशिनाथ निखाडे, पद्माकर गोविंद गायकवाड यांनी केली आहे. गत आठवड्यात मौजे सुकेणे सुकेणे शिवारातील नाशिक- औरंगाबाद राज्यमार्गावरील बाणगंगा पूलाजवळ राजू मधुकर मोगल यांच्या वस्तीवर त्यांचा मुलगा सौरभ राजेंद्र मोगल हा शेतकाम करीत असतांना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला होता. त्यांनतर ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.---------------------------------पिंपरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. पाळीव प्राणी व शेतक-यांवर हल्ला होत असून वनविभागाने त्वरित दखल घेऊन या भागात पिंजरा लावावा.-विजय अहेर , शेतकरी , पिंप्री

टॅग्स :Nashikनाशिक