बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:32 IST2018-08-25T14:32:17+5:302018-08-25T14:32:29+5:30

सायखेडा : गोदाकाठ भागात वारंवार फिरणार्या बिबट्याने धुमाकूळ घातला असून मुकी जनावरे बिबट्याचे शिकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.

The calf killed in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

सायखेडा : गोदाकाठ भागात वारंवार फिरणार्या बिबट्याने धुमाकूळ घातला असून मुकी जनावरे बिबट्याचे शिकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. महाजनपुर,दात्याने, येथील घटना ताजी असतांनाच चाटोरी (ता. निफाड) येथील दिलीप घोलप गट नं. ५६९ यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार केले आहे. आनंदवाडी भागात राहणारे दिलीप घोलप यांच्या वस्तीवर बिबट्याने रात्री १ वाजेच्या सुमारास हल्ला चढविला, आवाजाने घरातील, तसेच वस्तीवरील ग्रामस्थ जागे होत, बिबट्यावर बॅटरीचा प्रकाश सोडुन, फटाक्यांचा आवाज करून हुसकविण्याचा प्रयत्न केला, झालेल्या आवाजाने बिबट्या काही काळ बाजूला गेला, त्यानंतर सर्व झोपल्याने, शांतता बघून, काही काळाच्या अंतराने पुन्हा वासरावर हल्ला करत, वासरू शेजारील उसाच्या क्षेत्रात ओढत घेऊन जात ठार केले. पोलिस पाटील सचिन हांडगे यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळविली. याठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला असून, पिंजरा लावला आहे.

Web Title: The calf killed in a leopard attack

टॅग्स :Nashikनाशिक