बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:10 IST2021-03-10T01:09:45+5:302021-03-10T01:10:32+5:30

निफाड तालुक्यातील भुसे  येथे बिबट्याच्या हल्ल्यात  वासरू जखमी झाले.

Calf injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

निफाड : तालुक्यातील भुसे  येथे बिबट्याच्या हल्ल्यात  वासरू जखमी झाले. भुसे येथे सागर सीताराम भुसारे हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराशेजारील कांद्याच्या चाळीजवळ गाय आणि वासरू बाहेर बांधलेले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने वासरावर हल्ला केला. यावेळी गाईने हंबरडा फोडल्याने हा आवाज ऐकून  भुसारे कुटुंबीयांनी तातडीने  बॅटरीचा फोकस गाईच्या दिशेने मारल्यानंतर आणि आरडाओरड केल्यानंतर  बिबट्या पळाला.  मात्र या हल्ल्यात वासरू जखमी झाले. सदर घटना वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे  वनरक्षक सुनील महाले यांनी भुसारे यांच्या शेतात भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला. जखमी वासरावर म्हाळसाकोरेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गंभीरे यांनी उपचार केले.

Web Title: Calf injured in leopard attack