शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नाशिक महापालिकेच्या प्रभाग १३ मध्ये एप्रिलमध्ये पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 2:32 PM

आयोगाकडून घोषणा : ८ मार्चला मतदार यादी प्रसिद्धीस

ठळक मुद्दे १९ डिसेंबर २०१७ रोजी सुरेखा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे सदरची जागा रिक्त झालेली आहेदि. १७ फेबु्रवारी रोजी प्रभागाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर दि. १७ ते २६ फेबु्रवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत

नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. आयोगाने त्याअनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचाही कार्यक्रम जाहीर केला असून ८ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, आयोगाने एप्रिलमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केल्याने इच्छुकांनी तयारी आरंभली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग १३ मधील सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुरेखा भोसले यांनी मनसेकडून उमेदवारी केली होती. भोसले यांनी भाजपाच्या कीर्ती प्रतीक शुक्ल यांचा पराभव केला होता. दरम्यान, १९ डिसेंबर २०१७ रोजी सुरेखा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे सदरची जागा रिक्त झालेली आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने रिक्त जागेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. नियमाप्रमाणे, सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे अपेक्षित असते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या जागेवर एप्रिल २०१८ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय, भारत निवडणूक आयोगाकडून दि. १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबाबतचा कार्यक्रमही आयोगाने घोषित केलेला आहे. दि. १७ फेबु्रवारी रोजी प्रभागाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर दि. १७ ते २६ फेबु्रवारी या कालावधीत हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. दि. २७ फेब्रुवारीला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तर दि. ८ मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीतील दुबार नावांबाबत त्यांच्यापुढे विशिष्ट चिन्हे करून अशा मतदारांच्या ओळखीचे पुरावे काटेकोरपणे तपासण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हरकती व सूचनांनंतर मतदार यादीत लेखनिकांच्या चुका, दुसºया प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास आणि संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही मनपाच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे आदी सुधारणा व दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. मतदान केंद्र स्थापन करण्याबाबतही आयोगाने काही सूचना केलेल्या आहेत.इच्छुकांच्या हालचालीप्रभाग क्रमांक १३ मध्ये होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसेसह कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून प्रयत्न सुरु असले तरी शिवसेना व भाजपाकडून मात्र उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच सदस्याला उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, कॉँग्रेस-राष्टवादीतही काही इच्छुकांनी तयारी चालविली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता कमीच मानली जात आहे. भाजपाकडून पुन्हा एकदा कीर्ती शुक्ल रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक