शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नोटिसांमुळे व्यावसायिक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

नाशिक शहर वाहतूक युनिट १ शाखेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील व्यावसायिकांना दुकानांसमोर रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगबाबत  नोटिसा बजावल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, व्यावसायिकांची अडवणूक करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आडगाव : नाशिक शहर वाहतूक युनिट १ शाखेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील व्यावसायिकांना दुकानांसमोर रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगबाबत  नोटिसा बजावल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, व्यावसायिकांची अडवणूक करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  आडगाव परिसरात महामार्गावर अनेक हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, गॅरेज व्यावसायिक आहे. काही व्यावसायिकांना नाशिक शहर वाहतूक युनिट शाखेच्या वतीने नोटिसा बजावल्याने परिसरात अस्वस्थता पसरली आहे. दुकानाच्या समोर पार्किंगसाठी जागा नसल्याचे कारण देत नोटीस बजावली गेली असून, प्रत्यक्ष आपले म्हणणे सादर करण्यासाठी युनिट १ कार्यालयात समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. याबबत वाहतूक शाखेच्या कार्यालयात विचारणा केली असता मालवाहतूकदरांचा संप सुरू असल्याने नोटीस बजावण्याचे कामकाज थांबवले आहे. आंदोलन संपल्यानंतर अनधिकृत रस्त्यावर दुकानासमोर उभी करणाºया वाहनचालकांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे समजते. पण, हायवे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला ग्राहकच नाही. नानाविध कारणामुळे अनेक मालवाहतूक गाड्या उभ्या असतात. बºयाचदा अशी वाहने दुकानांच्या समोर उभी करतात, पण अशा वाहनचालकांनादेखील वाहने उभी करू नका, असे सांगितल्यास वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे बेशिस्तपणे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनचालकांवर कारवाई करावी. व्यावसायिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली.  मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या हेतुने द्वारकापासून कोणार्कनगरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड उभारण्यात आले, पण या सर्व्हिस रोडवर अनधिकृत पार्किंग, अतिक्र मण आणि बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे सर्व्हिस रोडने प्रवास करणाºया वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बरेच सर्व्हिसरोडऐवजी मुख्य मार्गाचा वाहतुकीला वापर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. या ठिकाणी याच मार्गावर नवीन आडगाव नाका येथे युनिट १ चे कार्यालय असून, नवीन आडगाव नाका ते पंचवटी कॉलेज अशा दोन्ही बाजंूच्या सर्व्हिस रोडवर सर्रासपणे वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पण येथील व्यावसायिकांवर व वाहनांवर कुठलीही कारवाई वाहतूक शाखेकडून न करता शहरापासून बाहेर असलेल्या व अजून पुरेशा सुविधादेखील मिळत नसलेल्या आडगाव परिसरांतील व्यावसायिकांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पार्किंगसाठी जागा असूनही नोटीसकाही व्यावसायिकांकडे पार्किंगसाठी पुरेशी जागा असूनदेखील नोटीस बजावण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुकानासमोर रस्त्यावर होणाºया अपघातांची जबाबदारी व्यावसायिकांची असून, या वाहनांमुळे अपघात झाल्यास व्यावसायिकास जबाबदार धरण्यास येईल, असा नोटीसमध्ये उल्लेख आहे, पण हायवे असल्याने बºयाचदा दुकानातील ग्राहकच नाही तर कोणीही दुकानाच्या समोर रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात, त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास वाद निर्माण होतात. त्यामुळे व्यावसायिक दुहेरी कात्रीत सापडले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस