चाक अचानक फुटल्याने बस बंद पडली.
By Admin | Updated: December 9, 2014 01:48 IST2014-12-09T01:48:39+5:302014-12-09T01:48:39+5:30
चाक अचानक फुटल्याने बस बंद पडली.

चाक अचानक फुटल्याने बस बंद पडली.
नाशिक : मागणी करूनही परिवहन महामंडळाच्या बसेसला चांगले साहित्य मिळत नसल्याने शहरात बसचे वारंवार अपघात घडत
आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास शिवाजी गार्डनसमोरून जाणाऱ्या बसचे पुढचे चाक अचानक फुटल्याने बस बंद पडली. बसचालकाने बसवर ताबा मिळवित बस जागीच थांबविल्याने पुढील वाहनावर आदळून अपघात होण्याचा संभाव्य धोका टळला.
महामंडळाला पुरविण्यात येणारी टायर्सही प्रक्रिया केलेली असल्याने त्याचा दर्जा दुय्यम असतो. त्यामुळे ती चाके पंक्चर होऊन वाहतूक कोंडी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. (प्रतिनिधी)