विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:38 IST2019-07-18T19:38:05+5:302019-07-18T19:38:47+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यांच्या तत्परतेने बस फेºया सुरू झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीे त्यांचा सत्कार केला.

धोंडगव्हाण येथे बस पोहचल्यावर आगारप्रमुख संध्या जाधव यांचा सत्कार करतांना दीपाली तिडके, मोनाली चौरे, अश्विनी थेटे, पूजा परदेशी, रोहिणी परदेशी, ऋतुजा कतवारे, काजल पूरकर, प्रशांत सोनवणे आदी.bus
पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यांच्या तत्परतेने बस फेºया सुरू झाल्याबद्दल विद्यार्थ्यांनीे त्यांचा सत्कार केला.
मागील चार महन्यांपासून धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव, बहाद्दुरीला जाणाºया बसचा मार्ग रस्त्याचे काम चालू असल्याने बदलण्यात आला होता. अनेक दिवसांपासून जवळपास दोनशे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल सुरू होते.
यात धोंडगव्हाण, पाचोरे वणी येथील प्रवाशांना पाच किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागत होती. गुरुवारी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी मोनाली चौरे, दीपाली तिडके, अश्विनी थेटे, पूजा परदेशी, रोहिणी परदेशी, ऋतुजा कतवारे, काजल पूरकर, प्रतिक्षा उगले, अंकित कतवारे, अंजिम शेख, ज्ञानेश्वर थेटे यांनी आगारप्रमुख संध्या जाधव यांची भेट घेऊन बसच्या फऱ्यांअभावी होणाºया त्रासाची आपली कैफियत मांडली. कुठलाही तोडगा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विद्यार्थी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर धोंडगव्हाण येथे पोहचल्यावर बससेवा सुरळीत सुरु करण्यात येईल असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्तकेले.
विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून गुरुवारी आम्ही रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर बससेवा पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. रस्ता अरुंद असल्याने इतर वाहनधारकांनी बसचालकांना सहकार्य करावे.
- संध्या जाधव, आगारप्रमुख, पिंपळगाव बसवंत.