औरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:34 IST2018-07-14T00:33:55+5:302018-07-14T00:34:15+5:30
नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़

औरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक
नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील सिडकोतील एमजीएम हॉस्पिटल परिसरात उभी असलेली लक्झरी बस (एमएच ०५-८५७३) गुरुवारी (दि.१२) रात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला़
नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून मध्यरात्री चाळीसगाव चौफुली परिसरात सापळा लावण्यात आला होता़ धुळेकडून भरधाव येणाºया बसला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा करताच हुलकावणी देत चालकाने बस पुन्हा धुळ्याकडे वळविली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत चिखलओहळ शिवारात ही बस थांबविली व चालकास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे समोर आले़