bus and rickshaw accident, 11 fearer death | बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक; 21 जणांचा मृत्यू
बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक; 21 जणांचा मृत्यू

देवळा (नाशिक) : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली असून, त्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 21 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

याबाबत कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात मेशी फाट्याजवळील वळणरस्त्यावर वेग नियंत्रणात न आल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत बसने रिक्षाला फरफटत नेत असताना दोन्ही वाहने विहिरीत पडली. विहिरीत रिक्षावर बस पडल्याने रिक्षामधील सात ते आठ प्रवासी आणि बसमधील तीन प्रवासी जागीच ठार झाल्याचे समजते.

या अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयही सज्ज झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. नाशिकहून जिल्हा रुग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

Web Title: bus and rickshaw accident, 11 fearer death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.