गोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:34 AM2018-08-20T01:34:53+5:302018-08-20T01:35:01+5:30

बर्निंग कारमधून दाम्पत्यासह त्यांची चिमुकली आश्चर्यकारणरीत्या बचावल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास उंटवाडी- गोविंदनगर रस्त्यावर घडली़

'Burning car' thunder on Govindnagar road | गोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार

गोविंदनगर रस्त्यावर ‘बर्निंग कार’ थरार

Next


सिडको: बर्निंग कारमधून दाम्पत्यासह त्यांची चिमुकली आश्चर्यकारणरीत्या बचावल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास उंटवाडी- गोविंदनगर रस्त्यावर घडली़ अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझविली असली तरी या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे़
रविवारी दुपारच्या सुमारास सचिन निंभोरकर हे पत्नी व आपल्या चिमुकलीसह त्यांच्या मारुती-८०० कारने गोविंदनगर रस्त्याने जात असताना त्यांच्या कारमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच निंभोरकर यांनी प्रसंगावधान राखत पत्नी व चिमुकलीसह कार बाहेर आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयाचे जवान एका बंबासह दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ दरम्यान, या घटनेत कार पूर्णत: जळाली असून या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Web Title: 'Burning car' thunder on Govindnagar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.