वीजतारांच्या धक्क्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:35 IST2021-05-12T22:43:18+5:302021-05-13T00:35:39+5:30

खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला. रामेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅकरच्या ट्रॉलीला विजेच्या तारा लागल्याने ट्रॉलीमधील संपूर्ण चारा जळून खाक झाला.

Burn the fodder in the trolley due to electric shock | वीजतारांच्या धक्क्याने ट्रॉलीतील चारा जळून खाक

देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे ट्रॉलीतील चाऱ्याला लागलेली आग.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

खर्डे : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथे चालत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील चाऱ्याला विजेच्या तारा लागल्याने चारा जळून खाक झाला. रामेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरून जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅकरच्या ट्रॉलीला विजेच्या तारा लागल्याने ट्रॉलीमधील संपूर्ण चारा जळून खाक झाला.

यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिकामी ट्रॉली बाहेर काढण्यात यश आले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा ट्रॅक्टर चांदवड तालुक्यातील राजदीर येथील असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या अकस्मात घटनेत चारा जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी रामेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन पगार, गोविंद पगार, अशोक शिपाई, किशोर पगार, विशाल पगार आदी धावून आल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: Burn the fodder in the trolley due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.