अनकवाडे येथे शेतातील चारा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:49 IST2020-11-30T00:48:02+5:302020-11-30T00:49:05+5:30
मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर ८ ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला.

अनकवाडे येथे शेतातील चारा जळून खाक
मनमाड : येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर ८ ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले व आग आटोक्यात आणली.