गवताच्या हजार गाठी मशीनसह जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:55 IST2022-03-30T22:53:38+5:302022-03-30T22:55:09+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले.

पिंपळगाव शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीचे गवताचे कुरण आहे. या कुरणातून गवताच्या गाठी विक्री केल्या जातात. बुधवारी दुपारी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या गवताच्या गाठींना आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीत जवळपास एक हजार गवताच्या गाठींसह मशीन जळून खाक झाले. आग लागताच अवघ्या काही क्षणातच पिंपळगाव व ओझर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, सुमारे तीन तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
(फोटो येणार आहे.)