सुरगाण्यात घरफोडी, सोन्यासह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:53 IST2019-07-10T17:52:50+5:302019-07-10T17:53:09+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

सुरगाण्यात घरफोडी, सोन्यासह रोकड लंपास
सुरगाणा : येथे आझादलेनमधील सुधाकर भांबेरे यांच्या घरी कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी तीन ग्रॅम सोन्यासह जवळपास नव्वद हजाराची रोकड लंपास केली आहे.
आझादलेन मध्ये सुधाकर भांबेरे हे आपल्या कुटूंबासह राहतात. सोमवारी (दि.८) त्यांच्या पाठच्या भावाचा तेराव्याचा कार्यक्र म असल्याने संपूर्ण भांबेरे कुटूंबिय नाशिकमध्ये एक दिवस आधीच मुक्कामी निघून गेले होते. हीच संधी साधून चोरटयाने मुख्य दरवाजाचे कुलूप कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट तोडून तीन ग्रॅम सोने व रोकड असा जवळपास नव्वद हजाराचा ऐवज लंपास केला. सुधाकर भांबेरे हे व्यावसायिक असून आपल्या कुटूंबासह शहर व तालुक्यातील आठवडे बाजार करून उदरिनर्वाह करतात. सातपूर येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या पाठच्या भावाचे आकस्मिक निधन झाल्याने बाजारातील आलेली विक्र ी व त्यातून दुसऱ्या व्यापाऱ्यांची देणी तशीच राहिल्याने एका कपाटात ठेवलेली होती. तर लहान मुलांच्या शाळेत कार्यरत असलेल्या त्यांच्या सूनेने त्यांचा साचवलेला पगार आठ हजार रु पये त्यांच्या खोलीतील कपाटात ठेवला होता. तीन ग्रॅम सोन्यासह जवळपास नव्वद हजार असा ऐवज चोरट्यांनी लांबवला. तेराव्याचा कार्यक्र म आटोपून भांबेरे कुटूंबिय घरी परतल ेतेव्हा दाराला कुलूप नसल्याचे दिसून आले. घरात चोरी झाली असल्याचे लक्षात येताच चेतन भांबेरे यांनी त्यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे, पोलिस निरिक्षक दिवानिसंग वसावे, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिवानसिंग वसावे हे तपास करीत आहेत.