घरफोडीत चांदीच्या वस्तूंची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:02 IST2020-03-07T00:00:56+5:302020-03-07T00:02:00+5:30

दत्तमंदिररोड गुरु देव को-आॅप. सोसायटीमध्ये बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ४० हजार रुपये किमतीचे पूजेच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.

Burglary of silverware | घरफोडीत चांदीच्या वस्तूंची चोरी

घरफोडीत चांदीच्या वस्तूंची चोरी

नाशिकरोड : दत्तमंदिररोड गुरु देव को-आॅप. सोसायटीमध्ये बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ४० हजार रुपये किमतीचे पूजेच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.
पिल्ले हे कामानिमित्त सहकुटुंब गेल्या तामिळनाडू येथे गेले होते. पिल्ले यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सामानाची उलथापालथ करण्यात आल्याचे शेजारी राहणाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी पिल्ले यांच्याशी संपर्क साधून नातेवाइकांच्या मदतीने घराला कुलूप लावून घेतले. चार दिवसांनी पिल्ले हे घरी आले असता त्यांना देवाच्या पूजेचे चांदीचे ताट, समई, करंडे, ८० ग्रॅमचे आठ शिक्के व घड्याळ असा सुमारे ४० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary of silverware