तिडके कॉलनीत रॉयल अपार्टमेंटमध्ये घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 01:35 AM2021-11-13T01:35:22+5:302021-11-13T01:36:14+5:30

तिडके कॉलनी कुटे मार्ग भागात अज्ञात चोरट्यांनी रॉयल अपार्टमेंट येथे गोविंदराव बाबूराव भोसले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे.

Burglary at the Royal Apartment in Tidke Colony | तिडके कॉलनीत रॉयल अपार्टमेंटमध्ये घरफोडी

तिडके कॉलनीत रॉयल अपार्टमेंटमध्ये घरफोडी

googlenewsNext

नाशिक : तिडके कॉलनी कुटे मार्ग भागात अज्ञात चोरट्यांनी रॉयल अपार्टमेंट येथे गोविंदराव बाबूराव भोसले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदराव बाबूराव भोसले यांनी गुरुवारी (दि. ११) मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी केल्याची फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी घरातून २० हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची पोत, २० हजार रुपये किमतीच्या दोन पाटल्या, तीन हजार रुपयांची सोन्याची नथ, दोन चांदीचे ग्लास यासह ५ हजार चारशे रुपयांची रोकड असा एकूण ४९ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Burglary at the Royal Apartment in Tidke Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.