औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:16 IST2018-08-22T13:15:51+5:302018-08-22T13:16:06+5:30
औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे

औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट
औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घराची पाहाणी केली असुन अधिक तपास करण्यात येत आहे. शहरापासुन हाकेच्या अंतरावर यशवंत नगरमधील रहिवाशी संजय दिनकर काटे हे गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन आपल्या कुटूबियांसह अकोला येथे नातेवाईकाकडे गेलेले आहेत. यामुळे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांना लक्षात आल्याने त्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप उघडून घरात घुसुन घरातील कपाट, लोखंडी तिजोरी फोडून त्यातील मुद्देमाल, रोख रक्कम व चीजवस्तु घेवून पोबारा केला आहे. काटे बाहेरगावी असल्याने घरातील कोणत्या वस्तु चोरीला गेलेल्या आहेत. याबाबत खुलासा होवू शकला नसल्याने पोलिस यंत्रणा देखील शोध घेत आहे. परिसरातील महिला व नागरीकांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.