दाभाडीत घरफोडी; लाखाेंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:50 IST2021-03-24T00:49:21+5:302021-03-24T00:50:07+5:30
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे गिरणा कारखाना रस्त्यावर असलेल्या दत्तनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व २४ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दाभाडीत घरफोडी; लाखाेंचा ऐवज लंपास
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथे गिरणा कारखाना रस्त्यावर असलेल्या दत्तनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व २४ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सेवानिवृत्त कर्मचारी अशोक कृष्णा पाटील यांनी छावणी पाेलिसात फिर्याद दिली. फिर्यादी अशोक पाटील बाहेरगावी गेले होते. ते गावाहून परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या कंपाउंडचा लोखंडी गेट व घराच्या सेफ्टी लोखंडी दरवाजाच्या कडीचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी १ लाख १० हजार रुपये किमतीचे ५ तोळे वजनाची सोन्याची मंगळसूत्राची पोत, २२ हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दोन ग्लास, २४ हजार ५०० रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला.