मालेगावी निजामपुरा भागात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:01 IST2022-03-02T01:01:22+5:302022-03-02T01:01:52+5:30

मालेगाव शहरातील निजामपुरा भागात सर्वे नं. ११५/०१/०२ प्लॉट नं.२७७/ ७६ मशीद हमजातुल्ला जवळ घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Burglary in Malegaon Nizampura area | मालेगावी निजामपुरा भागात घरफोडी

मालेगावी निजामपुरा भागात घरफोडी

मालेगाव : शहरातील निजामपुरा भागात सर्वे नं. ११५/०१/०२ प्लॉट नं.२७७/ ७६ मशीद हमजातुल्ला जवळ घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आशियाबानो अब्दूल गफ्फार (५४,रा. निजामपुरा) यांनी पवारवाडी पोलिसात फिर्याद दिली. पाेलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

गेल्या शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी ४.४५ ते रात्री ९.४५ च्या सुमारास ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील ६ हजार १० रुपये किमतीचा ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, ४५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार आणि १० हजारांची रोकड असा ६१ हजार १० रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक सपकाळे करीत आहेत.

Web Title: Burglary in Malegaon Nizampura area