गणेशनगर भागात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:47 IST2020-03-06T23:46:09+5:302020-03-06T23:47:06+5:30
तपोवन पंचवटी परिसरातील गणेशनगर येथील मधुर रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट नंबर पाचमधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.

गणेशनगर भागात घरफोडी
नाशिक : तपोवन पंचवटी परिसरातील गणेशनगर येथील मधुर रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट नंबर पाचमधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातून ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.
मधुर रेसिडेन्सीमधील या घरफोडीविषयी फ्लॅट मालक मयूर अण्णासाहेब बोरसे (३०) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने मयूर बोरसे यांच्या फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमधील रोख रक्कमेसह ९६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून, पोलिसांनी बोरसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.