मुंबई नाका, उपनगर भागात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:21 IST2020-02-02T23:42:08+5:302020-02-03T00:21:52+5:30

मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Burglaries in suburban Mumbai | मुंबई नाका, उपनगर भागात घरफोड्या

मुंबई नाका, उपनगर भागात घरफोड्या



नाशिक : शहरातील मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
घरफोडीची पहिली घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपालीनगरमधील जयश्री आर्केड येथील राजेश रमाकांत कुलकर्णी (५३) याच्या घरात घडली. राजेश कुलकर्णी बाहेरगावी गेलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर घरफोडीची दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागातील जुना सायखेडारोड येथील ओंकार हाइट्स येथे सिद्धांत अशोक जाधव (३०) यांच्या घरात घडली. सिद्धांत जाधव बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील दोन कपाटांतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरी वस्तीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशाप्रकारे घरफोड्या व भुरट्या चोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Burglaries in suburban Mumbai