घरफोडी करणारा सराईत अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:00 IST2018-06-25T00:00:31+5:302018-06-25T00:00:50+5:30
वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.

घरफोडी करणारा सराईत अटकेत
नाशिक : वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इंदिरानगर, उपनगर, भद्रकाली आदी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. इंद्या हा वडाळागावातील घरकुलच्या ए-२ इमारतीमधील खोली क्रमांक ३९ मध्ये वास्तव्यास आहे. पारिजातनगरमधील प्रकाश कैलास कटारिया यांच्या मालकीचे फर्निचरचे दुकान साईनाथनगर काळेमळा परिसरात आहे. या दुकानाचे शटर वाकवून इंद्या या संशयिताने दुकानामध्ये चोरीच्या हेतूने प्रवेश केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित इंद्याविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार माळोदे करीत आहेत.