घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:31 IST2018-11-17T00:31:33+5:302018-11-17T00:31:52+5:30
जेलरोड शिवाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : जेलरोड शिवाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर देवराम पवार (रा.चिन्नोर सोसा.शिवाजीनगर) हे ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधित कुटुंबासहीत बाहेरगावी गेले होते़
या कालवधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात घरफोडी करून कपाटात ठेवलेली सोनसाखळी, ३० हजारांची रोकड व महत्त्वाचे कागदपत्र असा सुमारे ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
कौटुंबिक वादातून हाणामारीत आठ जखमीपिंपळ खांब : परस्पर विरोधी गुन्हा दाखल
नाशिकरोड : पिंपळगाव खांब येथे बादलीच्या कारणावरून शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊन हाणामारी झाल्याने एकूण आठ जण जखमी झाले आहेत.
पिंपळगाव खांब भवानीनगर येथे राहणारे राजाराम जाधव यांच्या घरातील बादली काही दिवसांपूर्वी हरवली होती. त्या बादलीचा सर्वत्र शोध घेऊनही मिळून आली नव्हती. गुरुवारी सकाळी जाधव यांची हरवलेली बादली शेजारीच राहणारा सख्खा भाऊ महादू जाधव यांच्या घरात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून राजाराम जाधव
यांच्या कुटुंबीयांनी बादलीबाबत महादू जाधव यांच्या कुटुंबीयांना विचारणा केल्यामुळे वादविवाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारीमध्ये दोन्ही कुटुंबाकडून लाठ्या-काठ्या व लोखंडी गजांचा वापरदेखील करण्यात आला.
या हाणामारीत राजाराम जाधव, जिजाबाई जाधव, संजय जाधव, भाऊसाहेब जाधव, राहुल जाधव, महादू जाधव, संतोष जाधव, पुंडलिक जाधव असे दोन्ही कुटुंबातील आठजण जखमी झाले आहे.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.
लेखापालाने केला
ेनऊ लाखांचा अपहार
नाशिक : सातपूरच्या पपया नर्सरीत लेखापाल पदावर काम करणाºया लेखापालाने ग्राहकांकडील थकीत सुमारे साडेनऊ लाख रुपयांची वसुली करून घेऊन या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित अनिलगिरी अंबादास गोसावी (रा.जाधव संकुल, सातपूर) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित गोसावी हा पपया नर्सरी येथे लेखापाल पदावर कार्यरत असून, त्याच्याकडे गार्डन मेन्टेनन्स हेडची जबाबदारी आहे. संशयित गोसावी याने गार्डनचे काम घेतलेल्या ग्राहकांकडून थकबाकीची रक्कम वसूल केली मात्र ही रक्कम कंपनीकडे जमा न करता तिचा अपहार केला़