घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:25 IST2018-12-29T23:20:53+5:302018-12-30T00:25:13+5:30
दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास घडली़

घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
नाशिक : दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, अॅक्टिवा दुचाकीवरील दोघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना आडगाव शिवारातील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यमुनाबाई गोसावी या कुटुंबीयांसह राहतात़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सफेद रंगाच्या अॅक्टिवा दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी गोसावी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ यानंतर घरातील वरच्या मजल्यावर असलेले कपाट व शोकेसमधून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीची देवी, चांदीची चेन असे ३८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़