भगूरच्या पाण्यासााठी मंजूर बंधारा शासनाकडून रद्द
By श्याम बागुल | Updated: August 31, 2018 15:58 IST2018-08-31T15:56:20+5:302018-08-31T15:58:47+5:30
३० वर्षांपूर्वी भगूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागल्याने त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ९२-९३ साली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यात गावातील संपूर्ण जुनाट पाणीपुरवठा पाइपलाइन काढून नवीन मोठ्या लाइन टाकणे, नवीन टाक्या बांधणे आणि दारणा नदीकाठी कोल्हापूर टाइप बंधारा

भगूरच्या पाण्यासााठी मंजूर बंधारा शासनाकडून रद्द
भगूर : शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी शासनाने २५ वर्षांपूर्वी तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्यात सावरकर स्मारकासमोरील दारणा नदीपात्रात स्वतंत्र मंजूर केलेला बंधारा रद्द केला असून, या पाणीपुरवठा योजनेसाठी भगूर नगरपालिकेने केलेला खर्च वाया तर गेलाच, परंतु लष्कराच्या बंधाऱ्यावर अवलंबून असलेला शहराचा पाणीपुरवठा भविष्यात संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
३० वर्षांपूर्वी भगूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागल्याने त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ९२-९३ साली तिसरी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्यात गावातील संपूर्ण जुनाट पाणीपुरवठा पाइपलाइन काढून नवीन मोठ्या लाइन टाकणे, नवीन टाक्या बांधणे आणि दारणा नदीकाठी कोल्हापूर टाइप बंधारा बांधणे आदी कामांचा समावेश होता. सदरची कामे शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागाने गावातील पाणीपुरवठ्याची सर्वच कामे केली मात्र बंधारा बाधला नाही. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कालांतराने बंधा-याच्या बांधकामाची किंमत वाढली. त्यामुळे बंधाºयाचा प्रश्न बाजूला पडला. उलट प्रस्तावित बंधा-याच्या बाजुलाच लष्करी बंधा-यातून मुबलक पाणी मिळत असल्याने भगूरसाठी स्वतंत्र बंधा-याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. सध्या लष्करी बंधा-यातून भगूर नगरपालिकेला पाणी मिळत आहे, परंतु लष्कराने पाणी उचलू देण्यास नकार दिल्यास भगूरवर पाणी संकट कोसळण्याची भीती आहे. या संदर्भात भाजपा शहराध्यक्ष प्रसाद अंबादास आडके यांनी भगूर बंधारा कधी बाधणार याबाबतचे निवेदन शासनाला दिले असता, त्यावर जलसंपदा विभागाने पत्राद्वारे उत्तर देताना नमूद केले की, जायकवाडी प्रकल्पाच्या उध्व भागात नवीन प्रकल्प हाती घेण्यास मनाई करण्यात आलेली असल्याने भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळील दारणानदीवर नव्याने स्वतंत्र बंधारा बांधता येणार नाही असे कळवून सदर बंधाºयाची मान्यता रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे.
चौकट==