रेल्वेखाली सराफाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 01:20 IST2020-12-18T01:20:03+5:302020-12-18T01:20:25+5:30

उड्डाणपुलाखालील रेल्वेच्या विश्रामगृहाजवळ युवक सराफाने रेल्वेखाली आत्महत्या केली.

Bullion suicide under the train | रेल्वेखाली सराफाची आत्महत्या

रेल्वेखाली सराफाची आत्महत्या

नाशिकरोड : उड्डाणपुलाखालील रेल्वेच्या विश्रामगृहाजवळ युवक सराफाने रेल्वेखाली आत्महत्या केली. रेल्वे पोलीस सूत्रांनी सांगितले की, १३ डिसेंबरला सकाळी पावणे अकराच्या सुमारास योगेश प्रकाश रवाळेकर (४३, रा. साने गुरुजीनगर) या सराफ व्यावसायिकाने जळगावच्या दिशेने जाणा-या मालगाडीखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मोबाइल सीम कार्डवरून पोलिसांनी मयताचा नाव व पत्ता शोधला. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विष्णू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मागूलाल पारधी तपास करत आहेत.

Web Title: Bullion suicide under the train