बुलेट मोटारसायकल धडकेने ओझरला पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:59 IST2018-10-21T23:59:09+5:302018-10-21T23:59:26+5:30
ओझर टाउनशिप : येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडने जाणाऱ्या एका पादचाºयास बुलेटस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला.

बुलेट मोटारसायकल धडकेने ओझरला पादचारी ठार
ओझर टाउनशिप : येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडने जाणाऱ्या एका पादचाºयास बुलेटस्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला.
शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संतोष अर्जुन बंदरे (४२), रा. बंदरे मळा सायखेडा फाटा ओझर हे सर्व्हिस रोडने सावित्री हॉटेल बाजूकडून सायखेडा फाट्याकडे पायी येत असताना ओझरकडून नाशिककडे जाणाºया बुलेटस्वाराने (क्र. एमएच १५ जीजे ४१५०) त्यांना समोरून धडक दिल्याने ते व बुलेटस्वार दयाळ दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांनाही ओझर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.
दरम्यान उपचार सुरू असताना संतोष बंदरे यंचा रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यासंदर्भात ओझर पोलिसांनी बुलेटचालक लखन मुकेश दयाळ याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार एस.एन. माळोदे करीत आहेत.