पाटपिंप्री येथे वीज पडून बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 00:55 IST2021-10-18T00:54:20+5:302021-10-18T00:55:19+5:30
सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री येथे रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली.

पाटपिंप्री येथे वीज पडून बैल ठार
सिन्नर : तालुक्यातील पाटपिंप्री येथे रविवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली.
पाटपिंप्री येथील भाऊसाहेब सखाहरी उगले यांच्या शेतात काम सुरू होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उगले यांनी बांधाच्या कडेला बैल बांधले. अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. यात उगले यांचा बैल ठार झाला. अगोदरच शेतकरी अडचणीत असताना अस्मानी संकटाने खचलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.