शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विभागाकरिता अर्थसंकल्पात २९६३ कोटी रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:47 IST

शासनाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मागास व विशेष मागास प्रवर्ग या मंत्रालयीन विभागाची स्थापना केलेली आहे. मात्र अर्थसंकल्पात या विभागाकरिता तुटपुंजी तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवगार्तील लोकसंख्येच्या प्रमाणात या विभागासाठी तरतूद करण्याकरिता शासनाने तातडीने कारवाई करून आवश्यक उपाययोजना कराव्या

ठळक मुद्देछगन भुजबळांच्या पत्रावर सरकारचे स्पष्टीकरण

नाशिक : राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. मात्र या विभागासाठी अर्थसंकल्पात अत्यंत तुटपुंजी तरतूद केलेली असल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना मांडलेली होती. यावर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री राम शिंदे यांनी या विभागाकरिता २९६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती लेखी पत्राद्वारे भुजबळ यांना दिली आहे.छगन भुजबळ यांच्या कपात सूचनेत म्हटले होते की, शासनाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मागास व विशेष मागास प्रवर्ग या मंत्रालयीन विभागाची स्थापना केलेली आहे. मात्र अर्थसंकल्पात या विभागाकरिता तुटपुंजी तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवगार्तील लोकसंख्येच्या प्रमाणात या विभागासाठी तरतूद करण्याकरिता शासनाने तातडीने कारवाई करून आवश्यक उपाययोजना कराव्या अशी मागणी त्यांनी केली होती. यावर राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री राम शिंदे यांनी पत्राद्वारे भुजबळ यांना कळविले आहे की, ओबीसी समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी ओबीसी विभागाची निर्मिती केलेली आहे.विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाकरिता सन २०१८- १९ या वित्तीय वर्षामध्ये राज्य सर्वसाधारण आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी कार्यक्रमांतर्गत रु.२९१४.९२ कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून रु.४८.४३ कोटी इतकी तरतूद अनिवार्य करिता करण्यात आलेली आहे. तसेच नवीन योजना कार्यान्वित करावयाच्या झाल्यास तसेच ज्या योजनांमध्ये निधी अपुरा पडत असल्यास तो उपलब्ध करून देण्यात येईल अशी असेही शिंदे यांनी छगन भुजबळ यांना लिहिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक