शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘भाऊ-दादां’च्या भेटीने चर्चेला आले उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:59 AM

सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांची सकाळी गाठ पडली आणि गप्पा मारतांना दोघे कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून थोडे बाजूला जाऊन वेगळे गुप्तगू करू लागल्याने चर्चेला उधाण आले.

ठळक मुद्देमहाजन-पवार यांच्यात चर्चा : राजकीय गरम वातावरण गप्पांचा शीतल शिडकावा

नाशिक : सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांची सकाळी गाठ पडली आणि गप्पा मारतांना दोघे कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून थोडे बाजूला जाऊन वेगळे गुप्तगू करू लागल्याने चर्चेला उधाण आले.लोकसभा निवडणुकीपूर्वीच फड रंगू लागला आहे. केंद्रस्थानी अर्थातच सत्तारूढ भाजपा असणे अपरिहार्यच आहे. राफेलपासून आरक्षणापर्यंत आणि शेतकरी आत्महत्यापासून कष्टकऱ्यांच्या हलाखीपर्यंत सर्वच बाबतीत भाजपाचे सत्ताधारी सध्या आरोपीच्या पिंजºयात आहेत. सत्ताधिकाºयांना हटवून परिवर्तन करा, असे सांगत राष्टÑवादीचे नेते राज्यभर फिरत असून बुधवारी (दि.१७) नाशिकमध्येच परिवर्तन यात्रा होती. त्यानिमित्ताने अजित पवार हे सरकारची नामुष्की सांगत असताना सरकारची चमकदार कामगिरीसाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनदेखील नाशिकमध्येच आले. गुरुवारी (दि.१७) सीएम चषक क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स इनोव्हेशनचे उद््घाटन करण्यासाठी महाजन येथे आले असताना दादा आणि भाऊंचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात होता. गुरुवारी सकाळी गिरीश महाजन यांनी आमदार बाळासाहेब सानप आणि अन्य कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात जाऊन भेट घेतली आणि चर्चाही केली. ही चर्चा मोकळेपणाने होत असतानाच महाजन आणि अजित पवार यांनी काहीसे वेगळे जाऊन चर्चा केली तसेचआणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. उभयतात काय चर्चाझाली.सरकारच्या संकटमोचक गिरीश महाजन यांनी सध्या भाजपा सरकारवर आरोपांची राळ उठत असल्याने दादांना जरा सबुरीने घ्या, असा सल्ला तर दिला नाही ना अशी चर्चा दिवसभर उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांत पसरली होती.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणGirish Mahajanगिरीश महाजनAjit Pawarअजित पवार