दमणहून दारू आणणे डॉक्टरला पडले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:58 IST2020-12-18T19:58:09+5:302020-12-19T00:58:47+5:30
दिंडोरी : दमन येथे सहलीहून परतताना तेथील स्वस्त दारू मित्रांसाठी आणणे दिंडोरीतील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्यास चांगलेच महागात पडले आहे. गुजरात पोलिसांनी त्यांचे वाहन व दारू जप्त करत त्यांच्याविरुद्ध अवैधपणे मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

दमणहून दारू आणणे डॉक्टरला पडले महाग
ठळक मुद्देगुजरात पोलिसांकडून वाहनासह दारु जप्त
याबाबत गुजरात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी शहरात नावाजलेल्या थोरात हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक थोरात व त्यांची पत्नी हे स्वतःचे वाहन (क्रमांक एम एच १५ एचसी ८४४७) घेऊन दमनकडून नाशिककडे येत असताना दमन व गुजरात सीमेवरचे पोस्टवर तपासणी दरम्यान कारच्या सीट खाली ३४ बॉक्समध्ये दमन निर्मित दारू मिळून आली. गुजरात पोलिसांनी चौकशी केली असता, या डॉक्टर दाम्पत्याने मित्रांना वाटप करण्यासाठी दारू घेऊन जात असल्याची कबुली दिली. या घटनेने दिंडोरी शहरात खळबळ उडाली आहे.