शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सूर्याभोवती दिसले तेजोमय सप्तरंगी कंकण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:59 IST

वेळ शनिवारी (दि.२४) सकाळी ११:३० वाजेची. नाशिककर दैनंदिन कामात असताना अचानकपणे सूर्याभोवती एक सप्तरंगी कंकण झळकले. या सप्तरंगी तेजोमय वर्तुळाने बहुतांश लोकांचे लक्ष वेधून घेतले.

नाशिक : वेळ शनिवारी (दि.२४) सकाळी ११:३० वाजेची. नाशिककर दैनंदिन कामात असताना अचानकपणे सूर्याभोवती एक सप्तरंगी कंकण झळकले. या सप्तरंगी तेजोमय वर्तुळाने बहुतांश लोकांचे लक्ष वेधून घेतले. प्रकाशकिरणांचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी नाशिककरांच्या नजरा आकाशाकडे पुढील वीस मिनिटं खिळून राहिल्या.खगोलीय बदल नेहमीच नागरिकांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. वर्षानुवर्षानंतर खगोलीय आविष्कार होत असतात. आकाशात घडून येणाऱ्या या आविष्कारांकडे अलीकडे सोशल मीडियामुळे अनेकांचे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. लक्षवेधी खगोलीय बदलाविषयी जागरूकतादेखील वाढीस लागत आहे. असाच काहीसा बदल जो प्रकाशकिरणांमुळे घडून येतो तो नाशिककरांनी शनिवारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. सकाळी सूर्यकिरणे प्रखरपणे पडलेली होती. अचानकपणे ११.३० वाजेच्या सुमारास शहरात काहीसे ढग दाटून येऊ लागले आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू होताच सूर्याभोवती सप्तरंगी कंकणाकृती उमटलेली दिसली. या तेजोमय वलयाने नाशिककरांचे तत्काळ लक्ष वेधले. ज्यांचे प्रथम लक्ष वेधले गेले त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या लोकांना सांगितले. त्यामुळे अनेकांना आज सूर्यनारायणाचे बदललेले रूप पहावयास मिळाले. सुमारे वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ सूर्याभोवती सप्तरंगी वर्तुळ दिसत होते. अनेकांनी सूर्याचा हा नवा ‘लूक’ कॅमेºयात टिपला आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला. परिणामी अतिजलदपणे सूर्याभोवती कंकण उमटल्याची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली अन् नाशिककरांच्या नजरा आकाशला भिडल्या.वातावरणात ६ ते ७ किलोमीटर उंचीवर अति विरळ ढगांची निर्मिती होते. या निर्मितीला सायरस नावाची ढगनिर्मिती असे खगोलीय शास्त्रीय भाषेत म्हटले जाते. जेव्हा सूर्य डोक्यावर येऊ लागतो तेव्हा सूर्यकिरणे या ढगांवर पडतात तेव्हा ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांच्या २२ अंशांच्या कोनातून निरीक्षणाकडे वळतात. परिणामी जमिनीवरून सूर्याकडे बघताना सूर्याभोवती तेजोमय सप्तरंगी कंकणाकृती तयार झालेली दिसून येते.सूर्याभोवती जसे वर्तुळ बघावयास मिळाले तसे ते काहीवेळा चंद्राभोवतीही पहावयास मिळू शकतात. प्रकाशकिरणे ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर पडल्यानंतर ते परावर्तित होतात. या प्रकाशकिरणांचा हा आविष्कार म्हणता येईल. नाशिक शहरात हा आविष्कार अर्धा तास शनिवारी बघता आला. विद्यार्थ्यांमध्ये त्याचे कुतूहल पहावयास मिळाले. नाशिकमध्ये जेव्हा असे वर्तुळ दिसले तेव्हा ते अन्य शहरांमध्येही दिसले असेलच असे नाही. ‘सायरस’ढगांची निर्मिती वातावरणात असेल तेथेच, असा आविष्कार पहावयास मिळू शकतो.-अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक