शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बाणगंगा नदीवरील पूल बंद; अत्यावश्यक सेवेची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 9:26 PM

कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील कंटेन्मेंट झोनमधील सर्व रस्ते सील करून बाणगंगा नदीवर मुख्य वाहतुकीचा पूल बंद करण्यात आल्याने मौजे सुकेणेकरांच्या अत्यावश्यक सेवेची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. या पुलावरील वाहतूक खुली करावी, शक्य होत असेल तर निदान दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील कंटेन्मेंट झोनमधील सर्व रस्ते सील करून बाणगंगा नदीवर मुख्य वाहतुकीचा पूल बंद करण्यात आल्याने मौजे सुकेणेकरांच्या अत्यावश्यक सेवेची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. या पुलावरील वाहतूक खुली करावी, शक्य होत असेल तर निदान दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.मौजे सुकेणे येथे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर हा कंटेन्मेंट झोन जाहीर केला असल्याने या परिसराला जोडणारे सर्व रस्ते प्रशासनाने सील केले आहेत. कंटेन्मेंट झोन तयार केल्यानंतर या झोनमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशा सरकारी सूचना असताना, निफाडच्या प्रशासनाने मात्र या गावाची अत्यावश्यक सेवाही कसबे-सुकेणे बाजारपेठेशी जोडली गेली आहे, हे न ओळखता केवळ नियमांवर बोट ठेवत मौजे सुकेणेकरांची पुरती कोंडी केली आहे. कसबे-सुकेणे व मौजे सुकेणे या दोन गावांना जोडणाऱ्या बाणगंगा नदीवरील मुख्य पुलावरील वाहतूक बंद करून गावकऱ्यांना सुमारे चार किलोमीटरचा ओणे गावाहून फेरा मारून वैद्यकीय मदत, औषधे, दूध खरेदी करावे लागत आहे. तब्बल एक आठवड्यापासून मौजे सुकेणेकरांची अत्यावश्यक सेवांची कोंडी केली आहे. गावात एकही दवाखाना किंवा औषधांची दुकाने नाहीत. जर गावात कोणी अत्यवस्थ झाला तर त्यास वैद्यकीय मदत किंवा रुग्णवाहिका कशी उपलब्ध करायची, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. उपसरपंच सचिन मोगल यांनी बाणगंगा पुलावरून दुचाकी सोडण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.---------------------------------------------------कोरोना प्रतिबंध कारवाईसाठी आरोग्य विभाग व शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रांत अधिकारी यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे, आणखी चार-पाच दिवस नागरिकांनी सहकार्य करावे.- दीपक पाटील,तहसीलदार, निफाड-----------------------------------चांदोरी-सुकेणा-कोकणगाव रस्ता मौजे सुकेणे येथे खुला करण्याची मागणी केली आहे, परंतु कंटेन्मेंट झोनमुळे प्रशासन नकार देत आहे.- सचिन मोगल,उपसरपंच, मौजे सुकेणे

टॅग्स :Nashikनाशिक