शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या सुदृढतेसाठी मातेचे दूध ठरते वरदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:35 IST

आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते.

ठळक मुद्देमातेने स्वत:च्या आहाराची काळजी घ्यावीकडधान्याचा आहार उपयुक्त

आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते.

जगभरात एक आॅगस्ट ते सात आॅगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे बाळाला व आईला होणारे फायदे स्तनपानाचे महत्त्व स्तनपान कशा पद्धतीने करावे इत्यादी गोष्टींवर जनजागृती करण्यात येते परंतु स्तनपान अतिशय चांगल्या पद्धतीने जर बाळाला करावयाचे असेल तर स्तनपान करणार्या आईने स्वत:च्या आहाराची काळजी कशाप्रकारे घ्यावी जेणेकरून आईच्या दुधाचे प्रमाण व दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होईल कारण आईचे स्वास्थ जर चांगले नसेल तर आई आपल्या बाळाला चांगल्या प्रकारे स्तनपान करण्यास असमर्थ ठरते त्यासाठी प्रत्येक स्तनपान करणार्या आईने स्वत:च्या पोषणाची काळजी घेतलीच पाहिजे.

आईचे दुध अनेक कारणांसाठी पोषक असते. यात प्रामुख्याने आपल्या बाळाच्या वाढ व विकासासाठी, स्वत:ची झालेली झीज भरून काढण्यासाठी, चांगल्या दर्जाच्या दूध निर्मितीसाठी, रोजच्या कामाच्या ऊर्जेसाठी, बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि चांगल्या विकासासाठी दुध उपआयुक्त ठरते. आईचे दूध हे अमृत समजले जाते कारण, आईच्या दुधात बाळाच्या वाढ व विकासासाठी लागणारे सर्व पोषक घटक असतात तर अशावेळी जर जर आईच्या स्तनांमध्ये मुबलक प्रमाणात दुधाची निर्मिती होत नसेल तर बाहेर उपाशी राहू शकतो व त्याच्या पोषक तत्वाची गरज देखील पूर्ण होणार नाही. त्यासाठी आईने खालील गोष्टींचे गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे१ )दिवसभरात पाच ते सहा वेळा पौष्टीक आहार घेणे: आहारात सर्व प्रकारची धान्ये जसे गहू बाजरी ज्वारी नागली तांदूळ इत्यादी सर्व प्रकारच्या धान्यांचे सेवन करणे जेणेकरून सर्व पोषण मूल्य मिळण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आहारात दूध अंडी डाळी कडधान्य हिरव्या पालेभाज्या फळे इत्यादी प्रतिनियुक्ती पदार्थांचा वापर करावा२) दिवसभरात भरपूर प्रमाणात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.३) स्तनपान करणाऱ्या मातेने आहारात योग्य प्रमाणात इसेन्शियल फिट सिड्स जसे ओमेगा थ्री ओमेगा सिक्स यांचे सेवन करावे त्यासाठी आहारात जवसाची चटणी तिळाची चटणी भिजवलेले बदाम अक्र ोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे४ ) सुपरफुड्स: रोजच्या आहारात सुपरफुड्स म्हणजेच डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, लाडू खोबरे टाकून नागली शिरा राजिगरा शिरा जिरा ओवा बडीसोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे जेणेकरून दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी मदत मिळेल साखरेऐवजी गुळाचा वापर करावा५ )स्तनपान करणाºया आईने उग्र वासाच्या भाज्या जसे फ्लॉवर गवार वांगी त्याचप्रमाणे अतिशय तिखट पदार्थ तळलेले पदार्थ जंक फूड कॉल ड्रीम्स चहा व कॉफी यांचे सेवन करू नये६ ) स्तनपान करणा-या मातेने स्वत:ला मानिसक ताण तणाव यापासून दूर ठेवले पाहिजे व आनंदी वातावरणात बाळाला स्तनपान केले पाहिजे७) जेवणाच्या वेळा निश्चित असणं आवश्यक आहे.८ ) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधे घेऊ नये.

साधारणत: आवश्यक पोषण मूल्याची दैनंदिन गरज लक्षात घेतली तरकॅलरीज- अतिरिक्त + ६०० कॅलरीजप्रथिने - अतिरिक्त २५ ग्रॅमलोह- ३० ग्रॅमकॅल्शियम अतिरिक्त ६०० मिलिग्रॅमसर्व सोप्या गोष्टी आईने आपल्या रोजच्या आहारात अमलात आणल्या तर नक्कीच आईचे व बाळाचे पोषण योग्यरीत्या होऊन दोघांचे स्वास्थ निरोगी राहण्यास नक्कीच फायदा होईल.

- रंजीता शर्मा चौबे,आहार तज्ञ,विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालय नाशिक

टॅग्स :NashikनाशिकHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार