A breakdown in Kamayani's engine | कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड
कामायनीच्या इंजिनमध्ये बिघाड

मनमाड : लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पानेवाडी स्थानकात थांबविण्यात आली. दुसरे इंजिन जोडून ही गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली असली तरी प्रवाशांना मात्र तासभर रखडावे लागले.
रविवारी सायंकाळी कामायनी एक्स्प्रेस भुसावळकडे जात असताना पानेवाडी स्थानकाजवळ गाडी आल्यावर इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे चालकाने गाडी थांबविली. रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत तत्काळ दुसरे इंजिन बोलविण्यात आले. आलेले इंजिन गाडीला जोडले गेले. यानंतर गाडी भुसावळकडे रवाना झाली. यामुळे सुमारे तासभर प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागली. या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.


Web Title: A breakdown in Kamayani's engine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.