इगतपुरी तालुक्यात घरांची पडझड
By Admin | Updated: August 6, 2016 22:34 IST2016-08-06T22:33:56+5:302016-08-06T22:34:17+5:30
इगतपुरी तालुक्यात घरांची पडझड

इगतपुरी तालुक्यात घरांची पडझड
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या जोरदार अतिवृष्टीने मोठा कहर केल्याने नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती, रस्ते, घरांची पडझड व इतर सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वाडीवऱ्हे व नांदगाव बुद्रूक या दोन मंडळात महसूल यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करीत आहे.