शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

निफाडमध्ये दिलीप बनकरांकडून कदम यांच्या हॅट्ट्रिकला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:29 IST

निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले.

ओझर : निफाड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी विद्यमान आमदार अनिल कदम यांना 17668 मतांच्या फरकाने पराभूत करुन कदम यांना विजयाची हॅट्ट्रीक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळविले.कदम यांनी गेल्या दहा वर्षात जिल्हाभर वेगळी ओळख निर्माण केली होती. यंदा मात्र राष्टÑवादीच्या तिकीटावर पाचव्यांदा निवडणुक लढविणारे दिलीप बनकर यांनी मागच्या चुका सुधारत व राजकीय अनुभवातून अंतर्गत व्यूहरचना आखत निफाड मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. बनकर यांना 96354 तर अनिल कदम यांना 78668 मते मिळाली. ओझर गट वगळता इतर सहा गटात कदम यांनी केलेल्या गणितानुसार आकडे जुळले नाहीत. सुरुवातीच्या सात फेऱ्यांमध्ये बनकर यांनी मिळवलेली आघाडी ओझरकडून तुटेल अशी अपेक्षा असताना अपक्ष यतीन कदम यांनी घेतलेली 24046 मते कदम यांच्या दृष्टीने मोठी अडचणीची ठरली. त्यामुळे रणसंग्रामात चतुर असलेल्या कदम यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. दुसरीकडे विविध संस्था ताब्यात असल्याने बनकर यांना त्याची मोठी साथ मिळाली. त्यामुळे कदम यांनी जी राजकीय गणिते मांडली गेली होती, ती सर्वच फोल ठरली.गोदाकाठ भागात राष्ट्रवादीकडे एकही प्रभावी नेता नसताना बनकर यांनी दिलेली काट्याची लढत चर्चेची मानली जात आहे. ओझरपाठोपाठ सेनेचा बालेकिल्ला असलेल्या सुकेणे गटात राष्ट्रवादीने मिळविलेली आघाडी अभ्यासाचा विषय ठरून गेली आहे. विरोधकांना अंधारात ठेऊन बनकरांचे होम ग्राउंड असलेल्या पिंपळगावमध्ये त्यांनी कमी गर्दीत काढलेली रॅली राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानले जात आहे. शिवसेना, अपक्ष व इतरांकडून बनकर यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या टीकेला त्यांनी वैयक्तिकरित्या उत्तरे देणे टाळले हेसुद्धा तालुकावासियांना भावल्याचे बोलले जात आहे.भाजप-शिवसेनेची महायुती असतानादेखील भाजपचे दोन-तीन अपवाद वगळता आखडता घेतलेला हातही कदम यांच्या पराभवास काहीअंशी कारणीभूत ठरल्याच्या प्रतिक्रिया निकालानंतर राजकीय जाणकारात व्यक्त झाल्या.आज तालुक्यातील राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे अनेक नेते भाजप- सेनेमध्ये आहेत तर मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी हजारोंच्या संख्येने केलेली सदस्य नोंदणी नेमकी किती मतांमध्ये रूपांतरित झाली हा देखील अभ्यासाचा मुद्दा आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीपासून चुरस दिसून येत होती. बनकर यांनी जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मताधिक्य घेतल्याने ते तोडणे कदम यांना अखेरपर्यंत शक्य झाले नाही. आदित्य ठाकरे यांनी कदम यांना मंत्रीपद देण्याचा जाहीर शब्द दिला होता. पण त्यांचाही उपयोग झाला नाही. एकूणच सर्व घडामोडी पाहता दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ असाच निकाल निफाड मतदारसंघाने पहिल्यांदा अनुभवला. त्यामुळे राजकीय गणितात निफाडच्या मतदारांचे हात कुणीही धरू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे.विजयाची तीन कारणे...1शरद पवार यांची पिंपळगावी झालेली सभेचा परिणाम तसेच त्यांच्या झंझावाती सभांमुळे जनतेत वाटणारी सहानुभूती, एचएएलचा मुद्दा व शेतकºयांची झालेली एकजूट हा महत्त्वाचा वळणबिंदू.2दोन ते तीन नेते वगळता भाजपने सुरुवातीपासून घेतलेली मवाळ भूमिका राष्टÑवादीच्या पत्थ्यावर पडली.3विरोधी गोटातील शिलेदार टिकेच्या माध्यमातून लक्ष्य करीत असताना बनकर यांच्या गटाने घेतलेली समजूतदारीची भूमिका.महामार्गावरील गावे यातच दोन्ही प्रमुख उमेदवारांची चुरस होती. त्यातही खुद्द ओझर गावात कदम कुटुंबियातीलच दोन उमेदवार असल्याने मते विभागणी घडून आली. गंगाथडीच्या परिसरात अनिल कदम व दिलीप बनकर या दोघांनी बºयापैकी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतु बनकर यांना शरद पवार यांचा करिष्मा अंतिम चरणात यशापर्यंत घेऊन गेला.कदमांच्या पराभवाचे कारण...यंदा वाढलेला मतांचा टक्का, कांदा निर्यात बंदी मुळे नाराजी, उद्धव ठाकरे यांनी यावेळी निफाडमध्ये एकही सभा घेतली नाही, तसेच चुलत बंधू यतीन कदम यांच्या उमेदवारीमुळे कदम यांच्या मतांची झालेली विभागणी.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ अनिल कदम शिवसेना 78668२ यतीन कदम ब.वि. आ. 24046३ उत्तम निरभवणे बसपा 808४ संतोष आहेरराव वंचित ब. आ. 2667५ सय्यद लियाकत अपक्ष 480

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019niphad-acनिफाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक